पावसाचा मुक्काम वाढला? 15 मे पर्यंत मान्सून पूर्व पाउस बरसणार
09-05-2024

पावसाचा मुक्काम वाढला? 15 मे पर्यंत मान्सून पूर्व पाउस बरसणार
आज 9 मे 2024,
- आपण मागच्या अंदाजामध्ये 7 तारखेपासून पाऊस येणारे आठ ला मराठवाड्यात जाणारे म्हणून अंदाज सांगितला,
- त्याप्रमाणे पाऊस पडलाही, आज पासून परत शेतकऱ्यांसाठी अंदाज सांगू इच्छितो की राज्यात पावसाचा मुक्काम वाढला म्हणजेच आता 9 मे पासून ते 16 मे पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे
- मराठवाड्यापासून ते पश्चिम विदर्भापर्यंत पाऊस पडणारे, पण उद्या 10 मे पासून राज्यात मध्ये सगळीकडे अवकाळी पावसाला सुरुवात होणारे
- 10 मे, 11 मे, 12 मे, 13मे, 14मे, 15 मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणारे
- पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणारे त्यामुळे येथील शेतकऱ्यांना गरज आहे, आपल्या पिकाची काळजी घ्या
- त्यानंतर कोकणपट्टी भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने आंब्याची काळजी घ्यायची
- त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणारे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणारे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची
- त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणारे, म्हणून मध्य महाराष्ट्रातीळ सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच पंढरपूर, लातूर, जालना, नांदेड, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात एक पिकाच पाणी वाचला असा पाऊस पडणारे पण ह्या पावसामध्ये विजांचे प्रमाण जास्त असणारे
- एकंदरीत राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागात पाऊस पसणारे
- शेतकरी आपला कांदा आपण दहा ते पंधरा ते दरम्यान आपण आपलं झाकून टाकण्याची तयारी ठेवायची
- 22 मे ला मान्सून अंदमान बेटावर दस्तक देणारे आपल्याकडे येण्यासाठी त्या ठिकाणी पोषक वातावरण तयार होणार आहे,
- यावर्षी जुमाच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला पाऊस येणार आहे, जून जुलै मध्ये जास्त पाऊस पडणारे, ऑगस्ट महिन्यात कमी पडणारे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात घ्या
- 5 नोव्हेम्बरला परतीचा पाऊस येणार आहे म्हणजे 5 नोव्हेंबरला पाऊस परत निघून जाणार आहे
- मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्रात, 10 मे ते 15 मे दरम्यान चांगला पाऊस पडणारे म्हणून स्वतःची तसेच आपल्या जनावरांची काळजी घ्यावी दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणारे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा