बीड जिल्ह्यातील शेतकरी पुत्रानं शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली

03-01-2023

बीड जिल्ह्यातील शेतकरी पुत्रानं शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली

बीड जिल्ह्यातील शेतकरी पुत्रानं शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली

 

शेतकऱ्यांच्या व्यथा आता नवीन राहिलेल्या नाहीत. शेतकऱ्यांनी नेहमीच्या संकटाला सामोरं जात कुठपर्यंत जगायचं हा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर उभा आहे. एकीकडे ओला दुष्काळ, दुसरीकडे कोरडा दुष्काळ, कधी नापिकीचे संकट तर कधी रोगराईचं संकट, मात्र यातही शेतकरी वाटचाल करतोय. आपलं पीक जगवण्याच काम करतोय. मात्र, आता बीडच्या एका शेतकऱ्याने आपल्या व्यथेवर थेट मुख्यमंत्र्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचं आवाहन केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. या पावसाने बीडचे १४३ प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागले यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान देखील झालं. मात्र, त्या नुकसानीवर मात करत शेतकरी पुन्हा उभा राहिला. मात्र, आता या हंगामात गहू, ज्वारी, हरभरा यासारख्या पिकांना आता कुठेतरी उभारी आली. मात्र, शेतकऱ्यांपुढील समस्या संपत नसल्याचं दिसतंय, असं दत्ता सुरवसे म्हणाले.

गेल्या काही महिनाभरापासून विद्युत महामंडळाने वीज तोडणी चालू केल्याने जे काही जवळपास उरला सुरला पैसा होता तो शेतकऱ्यांनी महावितरणला दिला. बील भरुनही वेळेवर लाईट नसल्याने आणि दिवसा ऐवजी रात्री लाईट येत असल्याने तारेवरची कसरत सध्या शेतकऱ्यांची चालू आहे. या रात्रीच्या थंडीत विंचू आणि सर्पदंश होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्या शेतकरी पिकांना रात्रीचं पाणी देत आहे. मात्र, रात्री ऐवजी दिवसा वीज देण्यात यावी अशी वारंवार मागणी होऊन देखील आत्तापर्यंत शेतकऱ्यांना या मागणीला यश आलं नाही.

मागील काही निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा केला जाईल, असं आश्वासन राजकीय पक्षांनी दिलं होतं. अनेक राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात तसा उल्लेख देखील होता. मात्र, १२ तास नव्हे दिवसा आठच तास द्या ,अशी मागणी शेतकऱ्यांतून होतं आहे.

बीडच्या एका शेतकरी पुत्रानं थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देत एक दिवस रात्रीचे शेतात दारं धरून दाखवावं. मग तुम्हाला शेतकऱ्यांची व्यथा आणि खरी कथा ही कळेल, असं आव्हान थेट मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. भीमराव कुठे, असं त्या शेतकरी पुत्राचं नाव आहे.

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading