फायद्याची गुलाब शेती कशी करावी? पहा सविस्तर

17-04-2023

फायद्याची गुलाब शेती कशी करावी? पहा सविस्तर

फायद्याची गुलाब शेती कशी करावी? पहा सविस्तर 

अलीकडे गुलाब फुलांचा उपयोग सजावट, गुच्छ, हारतुरे करण्यासाठी वाढला आहे. त्यामुळे गुलाबाला वर्षभर चांगले मार्केट असते.

गुलाबाच्या फुलांचा उपयोग गुलाबपाणी, अत्तर तयार करण्यासाठी होतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद (Gulkand) तयार करतात. अलीकडे गुलाब (Rose) फुलांचा उपयोग सजावट, गुच्छ, हारतुरे करण्यासाठी वाढला आहे. त्यामुळे गुलाबाला वर्षभर चांगले मार्केट असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनूसार गुलाबाची पुढील प्रमाणे लागवड करावी.

जमीन

५० ते ६० सेंमी खोलीची पाण्याचा निचरा होणारी आणि सामू ५.५ ते ६.० असलेली जमीन लागवडीसाठी निवडावी.

पूर्व मशागत

लाल माती, शेणखत, वाळू २ : १ : १ या प्रमाणात मिसळून ९० सेंमी रुंदीचे ३० ते ४५ सेंटीमीटर उंचीचे गादीवाफे तीन टक्के फॉर्म्याल्डीहाइड या द्रावणाने निर्जंतुक करावेत.

सुधारित वाण

लागवडीसाठी फर्स्ट रेड, नोबलीस, स्काय लाईन, बियांका, टेमेंटेशन, पॅशन, गोल्डन स्ट्राइक बोर्डो, सुपरस्टार, सामुराई या सुधारित वाणांची निवड करावी.

लागवडीची वेळ

जुलै ते ऑगस्ट दरम्यान गुलाब रोपांची लागवड ४५ बाय २० सेंमी अंतरावर करावी.

खत मात्रा

५ ते १० किलो शेणखत, ३० ग्रॅम नत्र, ३० ग्रॅम स्फुरद आणि २० ग्रॅम पालाश प्रति चौरस मीटर लागवडीच्या वेळी द्यावे. त्यानंतर ४०० मिलीग्राम नत्र २०० मिलीग्रॅम स्फुरद आणि २०० मिलीग्रॅम पालाश प्रति झाड प्रति आठवडा द्यावे.

आंतरमशागत

वेळोवेळी वाळलेली रोगट पाने काढावीत. गादी वाफे खुरपून भुसभुशीत ठेवावेत.

पाणी व्यवस्थापन

ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या वाढीनुसार पाणी द्यावे.

पीक संरक्षण

शेंडेमर या रोगाच्या नियंत्रणासाठी छाटलेल्या भागास दहा टक्के बोर्डोपेस्ट लावावी. छाटणीनंतर लगेच कार्बेन्डाझिम ०.१ टक्के या बुरशीनाशकाची फवारणी करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप ०.०५ टक्के या बुरशीनाशकाची दर आठ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी इतर बुरशीनाशके व कीडनाशके लेबल क्लेम नाहीत.

काढणी व उत्पादन

लागवडीनंतर सहा महिन्यांनी फुले काढणीस येऊन प्रती चौरस मीटर प्रति वर्षे १९० ते २३० फुले मिळतात.

 

source : agrowon

rose cultivation, gulab sheti

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading