बियाण्याची उगवणक्षमता कशी तपासायची?

03-06-2023

बियाण्याची उगवणक्षमता कशी तपासायची?

बियाण्याची उगवणक्षमता कशी तपासायची?

घरच्याघरी तपासा बियाण्याची क्वालिटी 

घरचे बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, शुद्धता, इतर जातींच्या पिकांची भेसळ, रोगट किंवा फुटके बियाणे याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.

खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे अनेक शेतकरी खरीप पिकासाठी खते, बी, बियाण्याची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत.

बाहेरिल बियाण्याच्या गुणवत्तेविषयी खात्री नसल्यामुळे याशिवाय बोगस बियाण्यामुळे अनेक शेतकरी पेरणीसाठी घरचेच बियाणे वापरण्याला प्राधान्य देतात.

घरचे बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, शुद्धता, इतर जातींच्या पिकांची भेसळ, रोगट किंवा फुटके बियाणे याकडे दुर्लक्ष केले जाते.

अशा बियाणांचा पेरणीसाठी वापर केल्यामुळे उगवण चांगली होत नाही, त्यामुळे पेरणीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे बियाण्याची उगवणक्षमता (Seed Germination Test) तपासूनच पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.

बियाण्याची उगवण क्षमता घराच्या घरी कशी तपासावी?

  • सुरुवातीला धान्याच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य घ्याव. 
  • सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करुन घ्यावं.
  • गोणपाटाचे ६ चौकोनी तुकडे करुन हे तुकडे स्वच्छ धुऊन घ्यावेत. 
  • गोणपाटाचा एक तुकडा जमिनीवर पसरावा.
  • पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे, दीड ते दोन सेंमी अंतरावर १० -१० च्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावेत. 
  • अशाप्रकारे १०० दाण्याचे तीन नमुने तयार करावेत.
  • गोणपाट ओले करुन बियाण्यावर दुसऱ्या गोणपाटाचा तुकडा अंथरुन पुन्हा चांगले पाणी शिंपडावे. 
  • गोणपाटाच्या तुकड्यांची बियाण्यासकट गोल गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवावी. त्यावर अधून मधून पाणी शिंपडून बियाण्याची गुंडाळी सतत ओली ठेवावी.
  • ६ ते ७ दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडावी. 
  • चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करुन मोजावेत.
  • तिन्ही गुंडाळ्यांची सरासरी काढून शंभर दाण्यांपैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर आपले बियाणे बाजारातील बियाण्यासरखेच गुणवत्तेचे आहे असे समजावे. आणि शिफारशीप्रमाणे ते पेरणीसाठी वापरावे.
  • जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या तुलनेने ७० पेक्षा कमी म्हणजेच ६० पर्यंत असेल तर बियाण्याच प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी.
  • साठ टक्क्यांपेक्षा जर उगवणक्षमता कमी आली असेल तर असं बियाणे पेरणीसाठी वापरु नये.
  • अशा प्रकारे बियाण्याची उगवणक्षमता घरच्याघरी तपासून होणारं नुकसान टाळता येत.

Source : agrowon

 

 

Seed Germination Test, Kharif Season 2023, Seed Germination

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading