शेळ्यांचे उन्हाळ्यामधील व्यवस्थापन
25-04-2023

शेळ्यांचे उन्हाळ्यामधील व्यवस्थापन
शेळ्यांची उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी
- उन्हाळ्यात शेळ्यांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नाही तसेच करडांना जास्त दुधाची गरज असते त्यामुळे शेळ्यांना हिरवा चारा नसल्यास खुराक देणे खुप गरजेचे आहे, त्यामध्ये दूध वाढीसाठी पशु खाद्य तसेच मका, तुरीचा भरडा यासारखा खुराक द्यावा.
- उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यांपासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो, त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती ठेवण आवश्यक आहे.
- शेळ्यांना आंत्रविषार, लाळ्या खुरकूत आणि घटसर्प व अन्य रोगाचे लसीकरण करुन घ्यावे.
- लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व लसीकरण केल्यानंतर इलेक्ट्रोलाइट पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे, यामुळे लसीकरणाचा ताण येणार नाही.
- उन्हाळ्यात दुपारच्या सुमारास भरपूर ऊन असते, यामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते, ते टाळण्यासाठी शेळ्यांना सकाळी लवकर ६ ते ९ या वेळेस व संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत चरण्यासाठी सोडावे.
टीप : अशाप्रकारे शेतीविषयक महत्त्वाची माहिती, हवामान अंदाज तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या whatsapp ग्रुपला जोडले जा ➡ येथे क्लिक करा
source : krushinews