शेतीमाल विक्रीला सुरुवात, पण बाजारातील परिस्थिती काय सांगते…?
03-04-2025

शेतीमाल विक्रीला सुरुवात, पण बाजारातील परिस्थिती काय सांगते…?
मार्च एण्डमुळे येथे बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डातील व्यवहार २२ मार्चपासून, तर मोंढ्यातील भुसार मालाची खरेदी-विक्री २६ मार्चपासून बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता आर्थिक वर्ष संपले असून, ३ एप्रिलपासून व्यवहार पूर्ववत होत आहेत.
आर्थिक तंगीमुळे बाजार बंद:
मार्च एंडमुळे खरेदीदार आणि आडत्यांनी नाणेटंचाई निर्माण झाल्याचे सांगत १८ मार्च रोजी बाजार समितीला पत्र दिले होते. त्यानुसार प्रशासनाने संत नामदेव मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार २२ मार्चपासून, तर मोंढ्यातील भुसार शेतमाल व्यवहार २६ मार्चपासून बंद ठेवले होते. आता ही परिस्थिती सुधारली असून, ३ एप्रिलपासून व्यवहार सुरळीत सुरू होतील.
(टीप: सर्व शेतमालाचे जिल्ह्यानुसार व सर्व बाजार समितीचे बाजारभाव खालील लिंक वर पाहायला मिळतील👇🏻)
https://www.krushikranti.com/bajarbhav
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना:
बाजार समितीने शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केले आहे. मोंढा आणि हळद मार्केट यार्डात शेतमाल खरेदी-विक्रीतून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
हळद मार्केट यार्डासाठी विशेष सूचना:
- हळदीची मोठ्या प्रमाणात आवक अपेक्षित आहे, त्यामुळे वाहने रांगेत आणि क्रमांकानुसारच उभी करावीत.
- रांगेत घुसण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी बाजार समितीचे विशेष लक्ष असेल.
हळदीचे बीट आजपासून सुरू:
- मार्च एण्डमुळे नाणेटंचाईमुळे २२ मार्चपासून हळदीचे बीट बंद होते.
- आज (३ एप्रिल) पासून व्यवहार सुरू होणार असल्यामुळे हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे.
- सकाळी १०:३० वाजेपासून लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे.