आजचा कृषी सल्ला : सौर प्रकाश सापळा

02-04-2024

आजचा कृषी सल्ला : सौर प्रकाश सापळा

आजचा कृषी सल्ला : सौर प्रकाश सापळा

  • किडींच्या पतंगांना एका विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाचे आकर्षण असते. प्रकाश बघितल्यावर किडीचे पतंग त्याकडे आकर्षिले जातात, हीच गोष्ट लक्षात घेऊन सौर प्रकाश सापळा विकसित करण्यात आला आहे.
  • हा सापळा पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालतो. यासाठी संयंत्रातील बॅटरी ही सोलर फोटोव्होल्टाइन पॅनेलद्वारे चार्जिंग केली जाते, त्यामुळे विजेची बचत होते.
  • सापळ्यामधून निघणारा विशिष्ट प्रकाश हा किडींना आकर्षित करून घेतो. सापळ्याखाली असलेल्या कीटकनाशकात पतंग पडून मरतात, यामुळे किडीची पुढची पिढी तयार होण्यास अडथळा येतो.
  • सापळ्यामध्ये सोलर फोटोव्होल्टाइन पॅनेल, चार्ज कंट्रोलर आणि पॅनेलद्वारे उत्सर्जित झालेली ऊर्जा साठविण्यासाठी लीड ॲसिड बॅटरी वापरण्यात आली आहे.
  • सापळ्याची उंची ही पिकाच्या उंचीपेक्षा १ ते २ फूट उंच असावी लागते. हे लक्षात घेऊन सापळ्यामध्ये उंची कमी- जास्त करण्याची सोय आहे.
  • सापळा हा पूर्णतः स्वयंचलित असून सायंकाळी सुरू होतो आणि पाच तासांनी बंद होतो. 
  • बॅटरीमध्ये साठवलेली ऊर्जा ही सौर प्रकाश सापळ्यामध्ये रात्रीच्या वेळी पाच तासांपर्यंत वापरली जाते. एक सापळा हा एक एकर क्षेत्रासाठी पुरेसा आहे.
  • सापळ्याद्वारे यशस्वीरीत्या किडींवर नियंत्रण ठेवता येते.
  • सापळ्यावर पाऊस, पाणी आणि हवा यांचा परिणाम होत नाही.
  • धुके किंवा ढगाळ वातावरणात चार्जिंगकरिता इलेक्‍ट्रिक पोर्ट लावता येतो.
  • सौर प्रकाश सापळ्याच्या वापरामुळे कीटकनाशकाच्या फवारणीत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
  • हा सापळा वर्षानुवर्षे सतत चालतो, त्यामुळे दरवर्षी होणारा कीडनाशकांचा खर्च कमी होतो.

कृषिसल्लागार
कृषिरत्न डॉ सतीश भास्कर सोनवणे
 

solar light trap price, mgk solar trap, solar trap

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading