दूध देणाऱ्या जनावराचा आहार कसा असावा?

12-01-2023

दूध देणाऱ्या जनावराचा आहार कसा असावा?

दूध देणाऱ्या जनावराचा आहार कसा असावा?

  • दुभत्या जनावरांचे आहार नियोजन व्यवस्थितपणे झाल्यास जनावरांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.
  • आहारात क्षारमिश्रणे, जीवनसत्वे, हिरवा चारा, सुका चारा आणि खुराकाचा वापर समतोल प्रमाणात केल्यामुळे जनावर आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
  • विलेल्या जनावराला इतर जनावरापासून वेगळे ठेऊन त्याच्या आहार व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे.

आहारामध्ये कोणकोणत्या खाद्याचा समावेश करावा?

आहारामध्ये कोणकोणत्या खाद्याचा समावेश करावा या विषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या पुढील वेळापत्रकाचा अवलंब करावा.

  • जनावर विल्यानंतर पाचव्या दिवसापासुन घुग-या ऐवजी दिड किलो खुराक शरीर पोषणासाठी द्यावा.
  • उत्पादित दुधाच्या ४० टक्के प्रमाणात जास्तीचा खुराक थेाडा थोडा वाढवत नेऊन ८ – १० दिवसांत पुर्ण संतुलित आहार दयावा.
  • गाय रोज १० लिटर दुध देत असेल तर ४ किलो जास्तीचा खुराक दयावा. 
  • अशा प्रकारे गाईला १.५ किलो अधिक ४ किलो असा एकुण ५.५ किलो खुराक, अर्धा - अर्धा करुन सकाळ-संध्याकाळ दयावा.
  • हिरवा चारा किंवा मुरघास १० - १५ किलो व खाईल तितका कडबा दयावा.
  • दुभत्या म्हशीला पोषणासाठी रोज २ किलो खुराक दयावा. दुध उत्पादनाच्या ५० टक्के जास्तीचा खुराक दयावा. 
  • म्हणजे १० लिटर दुध देणा-या म्हशीस ५ किलो जास्तीचा खुराक दयावा.
  • अशा प्रकारे २ + ५ = ७ किलो खुराक रोज सकाळ–संध्याकाळ निम्‍मा भाग दयावा.
  • हिरवा चारा व सुकी वैरण गाई प्रमाणे दयावी. सहा लिटर दुध देणा-या म्हशीस १५ किलो डाळवर्गीय चारा जसे लुसर्न गवत, बरसीम, दशरथ, हादगा, शेवरी इ.
  • अधिक १५ किलो कडुळ किंवा मक्याचा हिरवा चारा आणि खाईल तितका कडबा दिल्यास खुराक देण्याची आवश्यकता लागत नाही.
  • सहा किलो पेक्षा जास्त दुध देणा-या जनावरास हिरवा चारा असला तरीही जास्तीचा खुराक देणे आवश्यक आहे. 
  • एक किलो खुराकाऐवजी ४ किलो डाळवर्गीय हिरवा चारा दयावा.

टीप : अशाप्रकारे शेतीविषयक महत्त्वाची माहिती, हवामान अंदाज तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या whatsapp ग्रुपला जोडले जा येथे क्लिक करा

source : agrowon

What should be the diet of milking animals?

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading