Weather : राज्यातील तापमानात अजूनही चढ-उतार सुरूच

14-12-2023

Weather : राज्यातील तापमानात अजूनही चढ-उतार सुरूच

Weather : राज्यातील तापमानात अजूनही चढ-उतार सुरूच

देशातील किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भात किमान तापमानात काही अंशांनी वाढ झाली. मुंबईतील किमान तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आग्नेय अरबी समुद्रावर सरासरी समुद्रसपाटीपासून 1.5 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्याच्या काही भागात उन्हाचा चटका अनुभवायला मिळत असून, ढगाळ हवामानासह उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील किमान तापमानात आणखी चढ-उतार कायम आहे. 

रत्नागिरी येथे बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या 24 तासात सर्वाधिक 34.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान 24 ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. निफाड येथे किमान तापमान 12.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

बुधवार (ता. १३) सकाळपर्यंत 24 तासांत नोंदवलेले तापमान (°C मध्ये)

ठिकाणकमाल तापमानकिमान तापमान
पुणे ३१.४ १५.०
जळगाव ३०.२ १५.२
कोल्हापूर २९.६ १८.५
महाबळेश्वर २५.३ १४.४
नाशिक २९.८ १४.१
निफाड २९.१ १२.८
सांगली २९.५ १७.१
सातारा ३०.० १५.४
सोलापूर ३१.८१७.५
सांताक्रूझ ३२.१ १९.४
डहाणू २८.८ १८.४
रत्नागिरी ३४.३ २०.३
छत्रपती संभाजीनगर २८.६ १५.२
नांदेड २९.२ १७.२
परभणी २९.३ १६.१
अकोला ३०.६ १७.०
अमरावती २८.६ १५.१
बुलडाणा २८.४ १५.६
ब्रह्मपुरी ३१.३ १५.६
चंद्रपूर २८.४१४.०
गडचिरोली २९.० १३.८
गोंदिया २७.६ १३.६
नागपूर २८.४१४.६
वर्धा २८.०१५.०
वाशीम २९.४ १४.८
यवतमाळ ३१.० १५.५

🌱अशाच शेतीविषयक माहितीसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇

https://chat.whatsapp.com/KhCCLMztU3Q3b9HurYDRkd

weather, temaparature, havaman andaj

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading