Cultivation : शून्य मशागत तंत्र म्हणजे काय?

23-01-2024

Cultivation : शून्य मशागत तंत्र म्हणजे काय?

शून्य मशागत तंत्र म्हणजे काय? 

  • संवर्धित शेती पद्धतीचा वापर करून जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी विकसित केलेले तंत्र म्हणजे ‘शून्य मशागत तंत्र' होय.
  • संवर्धित शेती करण्यासाठी राज्यात कोल्हापूर येथील प्रगत शेतकरी आणि कृषितज्ञ श्री. प्रतापराव चिपळूणकर यांनी स्वतःच्या शेतीतील प्रयोगातून विना नांगरणीची शेती सिद्ध करून दाखवली आहे. 
  • संवर्धित शेतीचे शास्रीय विश्लेषण करताना त्यांनी जमिनीच्या सुपिकतेचे आणि विशेष करून सेंद्रिय कर्बाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
  • कृषिरत्न श्री. चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांनी सगुणा बाग, ता. कर्जत, जि. रायगड येथे भात पिकावर आधारित पीक पद्धतीकरिता शुन्य मशागतीसाठी उपयुक्त म्हणून सगुणा राईस तंत्र (एसआरटी) विकसित केले आहे.
  • एसआरटी तंत्रामध्ये आणि विना नांगरणीच्या शेतीमध्ये सुरवातीलाच गादी वाफ्यावर पिकांची लागवड केली जाते व नंतर गादीवाफे न मोडता आणि कोणतीही मशागत म्हणजेच नांगरणी, कुळवणी, वखरणी न करता तसेच पाभरीने पेरणी न करता पुढील पिकांची टोकण पद्धतीने लागवड केली जाते.
  • तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निंदनी, भांगलणी किंवा कोळपणी न करता तणनाशकांचा वापर केला जातो.
  • पिकांची काढणी करताना पिके जमिनीलगत कापून घेतली जातात आणि खोडाचे अवशेष (राख), धसकटे व मुळे तशीच ठेवली जातात.
  • पिके किंवा तणे मुळासकट उपटून काढली जात नाहीत त्यामुळे पिकांची व तणांची मुळे जमिनीत
  • राहतात, कुजतात आणि त्यापासून संद्रिय खत तयार होते.
  • शून्य मशागत तंत्र राज्यातील भात, सोयाबीन, कापूस, मका, सुर्यफुल, हरभरा, झेंडू इ. पिकांसाठी कायदेशीर असल्याचा प्रयोगशील शेतकऱ्यांना अनुभव येत आहे.
  • सदर तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, इतर तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, हरभरा, इतर कडधान्ये, भुईमूग, सुर्यफुल, मोहरी, जवस, तीळ, इतर तेलबिया, कांदा, भाजीपाला, फुलपिके, औषधी व सुगंधी पिकांची लागवड करणे शक्य आहे. 
  • हळद, आले, बटाटा, रताळे, गाजर अशा पिकांचा जमिनीखाली पावणारा बहुतांशी भाग काढण्यासाठी जमिनीची मोठी खांदणी करावी लागत असल्याने या पिकांमध्ये शून्य मशागत तंत्र वापरण्यावर काही मर्यादा आहेत, 

Cultivation, मशागत म्हणजे काय, shifting cultivation, what is shifting cultivation

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading