Nashik Division Jayesh patil
15-06-18 0 Hits

Type: Sale


उत्तम व्यवस्थापनातून बांबू शेती पासून श्वास्वत उत्पन्न 

गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनापर्यंतची माहिती घेतली. सिंचनाची सुविधा असलेल्या भागामध्ये बांबू लागवडीची योग्य निगा घेतल्यास चाळीस वर्षांपर्यंत उत्पन्न देण्याची या पिकाची क्षमता आहे. त्यातच स्वमालकीच्या लागवडीतून कापणी, वाहतुकीसाठीच्या जाचक अटी कमी झाल्या आहेत. 

 *तणव्यवस्थापन* बांबू ही गवत प्रकारातील वनस्पती असून, त्याची मुळे साधारणतः जमिनीच्या वरील थरात असतात. मातीच्या वरील थरातील अन्नद्रव्यांसाठी तणाशी स्पर्धा होते. हे टाळण्यासाठी वेळोवेळी रोपांभोवतीचे तण काढावे. रोपांच्या सभोवतालची माती भुसभुशीत राहिल्यास खोडमुळाची वाढ जोमदार होते.

 *आंतरपिके* लागवडीनंतर बांबू तीन ते चार वर्षांनी पक्व होण्यास सुरवात होते. सुरवातीच्या दोन ते तीन वर्षांत आंतरपिके घेणे शक्य आहे. आंतरपिकातून अतिरिक्त उत्पन्नासोबतच जमीन तणविरहित राहण्यास मदत होते. 

*उत्पादन व उत्पन्न* कमी खर्चात उत्तम प्रतीच्या रोपांचा पुरवठा 15 बाय 8 फूट अंतरावर लागवड केल्यास प्रति एकरी 350 रोपे बसतात. त्यामधून पाचव्या वर्षी एका झाडा पासून 8 ते 10 नग बांबू मिळतात. प्रति एकरी 120 ते 150 टन उत्पादन एकरी 2.50 ते 3 लाख उत्पन्न पहिल्या वर्षी मिळते. एकदा केलेल्या लागवडीपासून पुढे सलग ४० वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. शिवाय दरवर्षी बांबूचे उत्पन्न १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढत जाते. हलक्‍या जमिनीत तसेच प्रतिकूल वातावरणातदेखील उत्पन्न मिळते. 

 *मृदा संधारण* : जमिनीची धूप थांबविण्यासाठी, जमिनीचा कस वाढविण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरते.

 *व्यावसायिकदृष्टीने बांबू लागवड* सध्या बांबूचा जागतिक व्यापार जवळपास ६०, हजार कोटी रुपयांचा असून, त्यात चीनचा वाटा ५०% आहे. सिंचनाची सोय असल्यास दीर्घकाळ (४० वर्षापर्यंत) उत्पादन देत राहण्याची बांबू लागवडीमध्ये क्षमता आहे. यासाठी मजुरांची गरजही कमी आहे. 

 *राष्ट्रीय बांबू मिशन योजना २००७* ः जागतिक तापमानवाढीच्या काळामध्ये पर्यावरण संवर्धन, डोंगर उतारावरील मातीची धूप रोखणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली. पूर्वी बांबू वाहतूक व तोडणीसाठी लागणाऱ्या वनखात्याच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. मात्र, बांबू वाहतुकीसाठी स्थानिकपातळीवरील गावकामगार पोलिस पाटील किंवा तलाठी दाखल्याची आवश्यकता असते. जून २०१५ च्या अध्यादेशानुसार स्वमालकीच्या जागेत लागवड केलेल्या बांबूची तोडणी करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. 

 बुकिंग व अधिक माहिती साठी संपर्क - 7776848660 जयेश पाटील

Nashik


Send Message Phone: 7776848660


QR code

Related ads

Hydroponic fodder systems

हायड्रोपोनिक्‍स तंत्र......! कमी दिवसांत चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञान हे हिरवा चारा उत्पादनासाठी पर्याय म्हणून पुढे येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यावर चारानिर्मिती करता येते. सध्याच्या दुष्काळी… Nashik Division

उत्तम दर्जाचा भोपळा विकणे आहे

 4 रुपये kg  1 एकर भोपळा देणे आहे contact what's app-9096090661 Nashik Division

Agro Growth Booster

यह एक शक्तीवर्धक, फलोत्तेजक एवम उपज वृद्धीकारक उत्पाद है।  यह फसल को रोग प्रतीकारक शक्ती प्रदान कर बिमारीयोंसे बचाता है।  फुल झडना बंद करता है एवं पैदावार बढाता है।  यह पौधों को नई उर्जा एवं शक्ती प्रदान करता है। पौधों के लिए एक अतिरीक्त पुर्ण खुराक है।  … Nashik Division

Road Front land for sell

रोड फ्रंट जमीन, पाण्याची सोय, १ मालकीची व्यवस्थीत जमीन  Nashik Division

custard apple

N.M.K गोल्डन सीताफळाची रोपे मिळतील.   गोल्डनची वैशिष्ट्ये-  १. फळाची चमक जास्त  २. टिकवण क्षमता १५ ते २० दिवस  ३. बाजारात सर्वात शेवट उपलब्ध त्यामुळे किंमत जास्त  ४.फळे वजनदार मिळतात   संपर्क- दुर्गा हायटेक नर्सरी  भैय्या गोरे -९६०४८०१८२८… Solapur


Report this ad