कोणत्याही जमिनीमध्ये जिवाणू शिवाय शेती होऊ शकत नाही अन्न उपलब्ध करून देण्यासाठी जिवाणू कारणीभूत असतात त्यांनी तयार केलेले अन्न पिक मूळीद्वारे घेत असते शकते त्यामुळे जमिनीमध्ये जेवढी जिवाणूंची संख्या जास्त तेवढी जमीन सुपीक म्हणून शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे एक अनोखे मिश्रण त्यामध्ये आठ+ प्रकारचे जिवाणू एकत्र आहेत .
जिवाणू खतातील उपलब्ध जिवाणू
१)रायझोबियम
२)अँझोटोबॅक्टर
३)अँझोस्पिरिलिम
४)सुडोमोनास फ्लोरसेन्स्
५)झिंक विरघळवणारे जिवाणू
६)स्फुरद विरघळवणारे जिवाणू
७)पालाश विरघळवणारे जिवाणू
८)अपशिष्ट विघटन करणारे जिवाणू
हे सर्व जिवाणू एकत्र असून त्याचा घरी बनवण्याचा खर्च फक्त 3 रुपया लिटर येतो.
या बरोबरच जमिनीतला काडीकचरा तणांच्या नियंत्रणासाठी अपशिष्ट विघटन करणारे जिवाणू यामध्ये उपलब्ध.
(वरील जिवाणू कृषी चिकित्सालय कडे पावडर स्वरूपात उपलब्ध आहेत. पहिल्यांदाच वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 70% सूट)
तयार करण्याची कृती
२०० लि टाकीसाठी पावडर १०० ग्राम घ्यावे ताक १ लि घ्यावे
२ कीलो गुळ टाकून १० ते १२ दिवस आंबवत ठेवणे त्यानंतर त्याला उग्र वास आल्यानंतर ते जमिनीत सोडण्यास तयार आहे असे समजावे.
५०० लि टाकीसाठी पावडर २५० ग्राम घ्यावे ताक ५ लि घ्यावे.
५ गुळ टाकून १० ते १२ दिवस आंबवत ठेवणे त्यानंतर त्याला उग्र वास आल्यानंतर ते जमिनीत सोडण्यास तयार आहे असे समजावे.
(वरील जिवाणू कृषी चिकित्सालय कडे पावडर स्वरूपात उपलब्ध आहेत. पहिल्यांदाच वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 70% सूट)
१००० लि टाकीमध्ये एक -५०० ग्रॅम पाकीट १० किलो गुळ व ५ लि ताक टाकून १० ते १२ दिवस आंबवत ठेवणे त्यानंतर त्याला उग्र वास आल्यानंतर ते जमिनीत सोडण्यास तयार आहे असे समजावे.
आपणही शेतामध्ये जिवाणूंचा वापर करून चांगल्या पद्धतीने पिक उत्पादन घेऊ शकता.
भारतीय पोस्टाची सेवा चालू असलेले आम्ही स्पीड पोस्ट ने आपल्यापर्यंत जिवाणू पावडर पाठवू शकतो यासाठी संपर्क करा.