सोनकुळ अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज निर्मित भू – समृद्धी सेंद्रिय खत

सोनकुळ अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज निर्मित भू – समृद्धी सेंद्रिय खत

भू – समृद्धी सेंद्रिय खत 

भु समृद्धी® सेंद्रिय खत शेणखताला एक उत्तम पर्याय असून शेणखताच्या तुलनेत भु समृद्धी® सेंद्रिय खत अन्नद्रव्ये, सुक्ष्म जिवाणू व पिक वाढीसाठी लागणार्‍या घटकांनी समृद्ध आहे. हे गव्हाचा भुसा, पोल्ट्री वेस्ट (कोंबड खत), जिप्सम, शेणखत, सोयाबीनचा भुसा, एरंडी पेंड, कोकोपीट इत्यादी पासून बनले आहे.

पिके: 

पिकभु समृद्धी® सेंद्रिय खत देण्याची वेळवापरण्याचे प्रमाण
द्राक्षेएप्रिल छाटणीचे वेळी३ ते ५ टन प्रती एकर
ऑक्टोबर छाटणीचे वेळी२ ते ३ टन प्रती एकर
केळीलागवडीचे वेळी२ ते ३ टन प्रती एकर
लागवडीनंतर २ ते ३ महिन्यांनी २ वेळा१ टन प्रती एकर
डाळींबताण सोडल्यानंतर५ ते २० किलो प्रती झाड
टोमॅटोलागवडीचे वेळी१ टन प्रती एकर
लागवडीनंतर १ महिन्याने५०० किलो प्रती एकर
ऊसलागवडीचे वेळी२ ते ३ टन प्रती एकर
बांधणी करताना२ ते ३ टन प्रती एकर
पपईलागवड करताना१ टन प्रती एकर
दर २ ते ३ महिन्यांनी१ टन प्रती एकर
कापूसलागवडीचे वेळी२ टन प्रती एकर
कांदा, लसूनलागवडीचे वेळी१ टन प्रती एकर
आंबा, काजू, नारळलागवडीचे वेळी२५ किलो प्रती झाड
दरवर्षी जूनमध्ये२५ किलो प्रती झाड
इतर भाजीपालालागवडीचे वेळी२ टन प्रती एकर
इतर फळपिकेलागवडीचे वेळी२० किलो प्रती झाड
दरवर्षी जूनमध्ये२५ किलो प्रती झाड
अन्नधान्य, कडधान्य व तेलबीयालागवडीचे वेळी१ ते २ टन प्रती एकर

 

भु समृद्धी® सेंद्रिय खताचे फायदे

  • भु समृद्धी® सेंद्रिय खत संपूर्णतः कुजलेले भरखत असून हे सेंद्रिय कर्बाने समृद्ध आहे. याच्या वापराने जमिनीच्या सेंद्रिय कर्बात भर पडून उपयुक्त जिवाणूंना अन्नपुरवठा होत असल्याने जमिनीचे जैविक तसेच भौतिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खतामधून पिकांना आवश्यक असणारे सर्व अन्नघटक नैसर्गीकरित्या उपलब्ध होत असल्याने पिकांची व मुळांची जोमाने वाढ होते.
  • अन्नद्रव्यांसोबतच इतर पोषक घटक भु समृद्धी® सेंद्रिय खतामधून मिळाल्याने पिकांचे आरोग्य उत्तम राहून त्यांची कीड व रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खताच्या वापराने पाने, फुले व फळांची गळ थांबून फळांना आकर्षक रंग व चमक येते.
  • पिकांच्या आरोग्यात भु समृद्धी® सेंद्रिय खतामुळे सुधारणा होत असल्याने मुळकूज, मर, रोपे सुकणे व पिवळी पडणे यांसारख्या विकारांचे प्रमाण कमी होते.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खत कुठल्याही प्रकारच्या सेंद्रिय अथवा रासायनिक खतांमध्ये सहजपणे मिसळता येते.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खत रासायनिक खतांसोबत मिसळून वापरल्याने त्यामधील अन्नद्रव्यांचा विविध कारणांनी होणारा र्‍हास कमी होऊन त्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. परिणामी रासायनिक खतांचा वापर कमी करता येऊ शकतो.
  • जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता भु समृद्धी® सेंद्रिय खताच्या वापराने वाढून अधिक काळापर्यंत जमिनीत ओलावा टिकून रहातो.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खताच्या नियमीत वापराने जमिनीचा पोत सुधारतो.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खतामधील उपयुक्त जिवाणू जमिनीचे आरोग्य सुधारण्यास तसेच अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्यास उपयुक्त ठरतात.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खताच्या वापराने रसायनांचा वापर मर्यादीत करता येतो. परिणामी निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करताना याचा वापर फायदेशीर ठरतो.

     
 मेसेज करा
 9699765871
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading